पातुर प्रतिनीधी पातुर पंचायत समीतीमध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक आडे गेल्या अनेक वर्षापासुन कार्यरत असुन त्याच्या नियम बाह्य काम करण्यात पटाईत असल्याची त्यांची प्रसिध्दी आहे. काही वर्षा अगोदर खानापुर येथे कार्यरत असतांना जिल्हा परीषद कडुन त्यांची एक ते पाच विषयाची चौकशी सुध्दा झाली. सध्या ते बोठखा चिंचखेड येथे सचीव पदावर कार्यरत असुन बोडखा येथील ग्राम पंचायतचा विकासकामाची व साहीत्य खरेदीची चौकशी केली तर मोठा भ्रष्टाचार उघड होऊ शकतो. सध्या बोडखा गावात घरकुल योजने खरे लाभार्थी या योजने पासुन वंचीत असुन .आडे महाशयाने गावातील पक्या घर धारकांची कच्चे घरधारक किवा खुली जागा अशी खोटी माहीती शाषनाकडे पाठविल्याने बोडखा चिंचखेड गावातील खरे लाभार्थी घरकुल योजने पासुन वंचीत राहले आहे.डिआरडी कडुन घरकुल धारकांचे जुण्या यादी प्रमाणे न दाखवत आपल्या मर्जीतिल लोंकाचे नावे प्रथम क्रमांकावर घेतल्याने गावात चर्चेला उधान आले आहे. या गंभीर बाबीची माहीती नवनिर्वाचीत सरपंच उपसरपंच व सदश्याना माहीती न पडु देता ही यादी डिआरडीला पाठविण्यात आली. काही दिवसा अगोदर बोडखा येथे नवनिर्वाचीत सरपंच पदी युवा नेतृत्व मतदारांनी निवडुन दीले. अनेक वर्षा पासुन विकासापासुन कोसो दुर असलेल्या गावचा विकास होईल म्हणून मतदारांनी युवा पिढीच्या हातात गावाच्या विकासाच्या चाब्या दील्या. परतु पहील्याच घरकुल योजनेच्या यादीत सचीवाने घोळ केल्याने खरे लाभार्थी या योजने पासुन वचीत राहले.बोडखा ग्राम पंचायतची विविध कामाची चौकशी वरीष्ठानी केल्यास मोठे घबाड बाहेर येऊ शकते
