पातुर प्रतिनीधी पातुर शहरापासुन अवघ्या तिन किलो मिटर अंतरावर जंगलाच्या पायथ्याशी वसलेले बोडखा चिंचखेड गाव असुन या गावात बहुतांश नागरीक हे मोलमजुरी करणारे असुन नोकर वर्ग हा बाहेरगावी राहतो. या गावात युवती करीता व वेगवेगळ्या कामाकरीता ग्रामसेवक आडे यांनी लाखो रुपये खर्च केल्याचे कागदोपत्री दीसुन येत आहे.

गावातील महीलांना प्रशिक्षण देने साहीत्या पुरविणे या करीता तिस हजार रुपये , गावातील हातपंप व पाणी पुरवठा दुरुस्ती साठी 1 लाख रुपये , गटार सफाई व ब्लीचींग पावडर करीता 50 हजार रुपये , कचरा कुंटी खरेदी व बांधकाम साठी 1 लाख रुपये खर्च केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. ग्रामसेवक आडे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या करीता गावातील युवा वर्ग पुढाकार घेणार असुन. बेजाबदार पणे वागने .नागरीकांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करणे. हे ग्रामसेवक आडे यांचा नित्यनियमच आहे. सचीव आडे याच्या निश्क्रीयतेमुळे गावातील अनेक नागरीक विविध योजने पासुन वंचीत राहले आहे. या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी नवनिर्वाचीत सरपंच सह ग्राम पंचायत सदस्य करतिल काय अशी मागणी बोडखा चिंचखेड वासी करीत आहे.