पातुर प्रतिनिधी बोडखा या गावात बंजारा समाजाचा मोठा समाज असुन 15 फेब्रुवारी ला भारतभर मोठ्या उत्साहात संत सेवालाल महाराज जयंती साजरी होत असतांना.बोडखा ग्रामपंचायत येथे सर्व समाजघटकातील नागरीक ग्रामपंचायत येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यासाठी जमा झाले होते. या जयतीला ग्राम पंचायतचे लोकप्रतिनिधीसह सर्व कर्मचारी वर्ग सकाळी आठ वाजता पासुन सचीव आडे यांची प्रतीक्षा करीत होते. त्यांना मोबाईल वरुन आज संत सेवालाल महाराजाची जंयती असलेल्याचे कळविले परंतु या महाशयाने जयंती हजर न राहता मळसुर येथे ग्रामसभा असल्याने मि येवु शकत नाही म्हणून जयंती साजरी करण्याचे टाळुन पातुर येथे एका हाँटेल मध्ये सकाळी दहा वाजे पर्यत धुम्रपान करीत राहले .शेवटी गावकरी मंडळी व लोकप्रतीनिधीनी ग्रामपंचायत कार्यलयात जंयती मोठ्या उत्साहानं साजरी केली बोडखा हे गाव पातुर पासुन अवघ्या तिन किलोमिटर अंतरावर असुन मोटार सायकल ने पाच मिनीटात ग्रामसेवक आडे पोहचु शकले असते. परंतु ग्रामसेवक आडे यांना जाणुन बुजुन बोडखा वासीयांचा अपमान करायचा होता म्हणून ते या महान संत सेवालाल महाराज जयंतीला उपस्थीत राहले नाही. ग्रामसेवक आडे यांच्या कृतीचा बोडखा ग्रामवासी निषेध करीत आहे
