अकोला येथील गुरुकुल परीसरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगर सेवक श्री मंगेश काळे यांच्या नेतृत्वाखाली हजारो भावीकांना आळंदी येथील तात्या महाराज गांवडे यांच्या उपस्थितीत गुढीपाढव्याच्या पुर्व संध्येपासुन भाविकांना मोठ्या प्रमाणात मोफत रुद्राक्ष वाटप करण्यात येत आहे

. महापुराण कथा प्रवचनकार प्रदीप मिश्रा महाराज यांची मध्य प्रदेश येथील शिवर येथे रुद्राक्ष वाटपाच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यांने अनेक भावीकांना रुद्राक्षविनाच परतावे लागले.

अनेक भावीकांचे प्रवाशा दरम्यान मोठ्या प्रमाणात हाल झाले. भावीकांची निराशा होऊ नये या करीता शिवसेना उपजिल्हा प्रमुख मंगेश काळे यांनी विषेश व्यवस्था करुन भावीकांना लाखो रुद्राक्ष उपलब्ध करुन दीले आहे. गुरुकुल परीसरात भावीकांनी रुद्राक्ष घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली .सर्व भावीकांना रुद्राक्ष मिळावे या करीता मंगेश काळे मित्र परीवारा तर्फे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे माजी नगर सेवक तथा उपजिल्हा प्रमुख मंगेश काळे यांच्या स्तुत्य कार्यक्रमाचे सर्वत्र स्तरावर कौतुक होत आहे.