(संगीता इंगळे सह आकाश राऊत प्रतिनिधी )
पातुर तालुक्यातील तांदळी बु गावाजवळ फटका कारखाना असुन या कारखान्यात दी 28 मार्च रोजी सकाळी मोठा स्पोट झाल्याने एक मजुर या स्पोटात जळुन खाक झाला तर चार जण गंभिर जखमी झाले

. संपुर्ण परीसर हादरला असुन अनेक बांधकामाना तडे बसले आहे . स्पोटाची त्रीवता एवढी मोठी होती की घराचे तुकडे चारशे मिटर पर्यत उडाले. कारखाना परीसरातील अनेक वाहने जळुन खाक झाली. घटना स्थळी पातुर ठाणेदार हरीष गवळी आपल्या ताफ्यासह पोहचुन घटनेचा पंचनामा केला.

या भिषन स्पोटात कारखान्यात काम करणारा मजुर शेख रज्जाक राहणार अकोट फैल , शिरोडा रहीवाशी हा जाग्यावरच जळुन मृत झाला.

तर दादाराव नवखरे, धम्मपाल खंडेराव , रिना खंडेराव , मंगेश खंडारे, रिना खंडारे हे गंभिर जखमी असुन जखमीना 108 रुग्नवाहीकेना उपचाराकरीता अकोला येथील शासकीय रुग्नालयात दाखल करण्यात आले . हा भिषन स्पोट कश्यामुळे झाला याचा तपास पातुर पोलीस करीत आहे