६५ विधवा महिलांना साडी चोळीचे वाटप..
पातूर : पातुर तालुक्यातील पातुर पंचायत समिती अंतर्गत येणारे ग्राम झरंडी येथे रामसिंगजी जाधव यांचा ७५ वा वाढदिवस अमृत महोत्सव नुकताच संपन्न झाला आहे.

झरंडी येथील ग्रा.पं. वतीने माजी समाजकल्याण सभापती,तथा संचालक जिल्हा बॅंक पदी विराजमान असताना राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व देणारा आपल्या कामातून प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून ओळख निर्माण करणारे व सामाजिक बांधिलकी जपून समाजासाठी पूर्ण आयुष्य समर्पित करून आजही समाजासाठी नव्हे तर गोरगरीब जनतेसाठी अविरत सुखदुखात हजर असणारे रामसिंगजी जाधव यांचा वाढदिवस झरंडी येथील ६५ विधवा महिलांना साडी चोळीचे
वाटप करुन साजरा करण्यात आला आहे, तसेच सदरहू कार्यक्रम हे ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून , प्रीती समाधान जाधव सरपंच व उपसरपंच प्रमुख पाहुणे विक्रम जाधव आणि सदस्य गण यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य बबन किसन शिंदे तर आभार प्रदर्शन प्रशांत बलक यांनी केले. विक्रम जाधव यांनी आपल्या भाषणातून रामसिंग जाधव यांनी केलेल्या कार्याला उजाळा देत
पातूर तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षण संस्थाच्या माध्यमातून गोर गरीबांसाठी शिक्षणाची दारे उपलब्ध करुन देण्यात साहेबांचा महत्वाचा वाटा आहे. असे आपल्या भाषणातून सांगितले त्यांचा ७५ वा वाढदिवस जिल्हाभरात विवीध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला असून डीजे, पुष्पगुच्छ फटाके अशा फालतू गोष्टीवर पैशाची उधळपट्टी न करता झरंडी येथील ग्रा.पं.प्रशासनाच्या वतीने विधवा महिलांना सन्मानित करुन साडीचोळीचे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम संपुर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. यावेळी झरंडी येथील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.